Bharteey Streejeevan (भारतीय स्त्रीजीवन)

By Geeta Sane (गीता साने)

Bharteey Streejeevan (भारतीय स्त्रीजीवन)

By Geeta Sane (गीता साने)

200.00

MRP ₹220 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

261 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

ISBN

9788174869180

Weight

265 Gram

Description

स्त्रीने आपल्या स्वातंत्र्यासाठी चालविलेली चळवळ या यंत्रयुगातील, गेल्या दोन दशकांमधील आहे; पण स्त्रीचे परावलंबन मात्र फार पुरातन असून तिची ही पराधीनता समाजाच्या आणि तिच्याही अंगवळी पडलेली आपल्या परवशतेची तिला खंत वाटत नाही; उलट, आपला भार समर्थपणे सांभाळणारा पती तिला पाहिजे असतो. स्वतंत्र पुरूष व त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारी स्त्री ह्यांच्यात बरोबरीचे नाते निर्माण होण्याची शक्यता नसते, हेही स्त्रीला उमजत नाही. त्यामुळे ‘आपले गौण स्थान हा आपल्याला मिळालेला स्त्रीजन्माचा शाप आहे’ असेच मूठभर जागृत स्त्रियांनाही वाटत असते. भारतात स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ नसल्यामुळे त्याबद्दलचे आमचे विचार विकासलेले नाहीत, प्रौढ झालेले नाहीत. “स्वातंत्र्यावर जागत्या डोळ्यांचा निरंतर पहारा” करण्याचे आम्हांला सुचलेही नाही. आणि आज एका स्त्रीलिंगापुढे स्त्रियांचे इतर सारे गुण कुठल्याही बिकट प्रसंगी मातीमोल ठरत आहेत, गिरिजन व इतर दुबळ्या स्त्रिया यांवर अनन्वित अत्याचार होत असताना, त्यांचा प्रखर व परिणामकारक निषेध करण्याइतकाही आत्मविश्वास स्वतंत्र स्त्रियांना आलेला नाही, मग घटनास्थळी जाऊन विचारपूस करणे दूरच राहिले. ही परिस्थिती अनिष्ट आहे. दूर लागलेली आग वेळेवर विझवली नाही तर अखेर आपलेही घर तिच्या भक्ष्यस्थानी पडते. तेव्हा एक माणूस म्हणून जगण्याचे व जबाबदार नागरिक म्हणून समाजात निर्भयतेने वावरण्याचे अधिकार मिळवण्यासाठी आणि ते राखण्यासाठी, स्त्रिलिंगी संपूर्ण समाजगटाच्या समस्यांचा सर्वांगीण विचार आवश्यक आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%