Vakayakosh: Part 1 - 3 (वाक्यकोष: भाग 1 - 3)

By Vaman Keshav Lele (वामन केशव लेले)

Vakayakosh: Part 1 - 3 (वाक्यकोष: भाग 1 - 3)

By Vaman Keshav Lele (वामन केशव लेले)

1300.00

MRP ₹1430 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Reference

Print Length

1375 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174347596

Weight

1260 Gram

Description

भाग १ \nशब्दयोगी अव्यय’ म्हणजेच ‘Preposition’. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही ‘above’ किंवा ‘over’ कधी वापरायचं, ‘in’ आणि ‘into’ मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच.\nइंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत.\nअर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत. या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल.\nभाग २\nमराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय\nआहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा\nएकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक बहुपदी क्रियापद अस्तित्वात येते त्याला\nइंग्रजीत phrasal verb म्हणतात. ते एक स्वतंत्र क्रियापद असून अर्थदृष्टया मूळ क्रियापदाहून\nवेगळे असते..\nप्रत्येक phrasal verb मधील घटक एकमेकांशी सहयोग करून एक नवीन क्रियापद सिध्द\nकरतात. म्हणनूच इंग्रजीतील phrasal verb ह्या संकल्पनेसाठी मराठीत ‘सहयोगी क्रियापद’हा\nप्रतिशब्द वापरला आहे.\nप्रस्तुत कोशात पाच हजारांहून अधिक सहयोगी क्रियापदांचा समावेश केला असून त्यांच्या\nस्पष्टीकरणासाठी मराठी वाक्ये रचून त्यांची इंग्रजी भाषांतरे सादर केली आहेत.\nसहयोगी क्रियापदे भौतिक घटनांची तसेच मनुष्याच्या अगणित कृतींची व अनुभवांची\nअभिव्यक्ती अचूकपणे व प्रभावीपणे करतात. ह्यातच त्यांची उपयुक्तता सामावलेली आहे.\nभाग ३\nरोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश.\n


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%